सध्या अनेक भ्रष्टाचार, फसणूकीच्या घटनांमध्ये भरपूर वाढ झालेली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीती चे वातावरण पसरले आहेच अशातच अलीकडे अवैद्य वाळू प्रकरण खूपच गाजत आहे. सांगोला तालुक्यात वाळू तस्करी जोमात सुरु असल्याचे नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. महूद भागात पूर्वी बंद केलेले वाळू तस्करी जोमात…तर वाळूचे दर गगनाला भिडले आहेत. बाबासाहेब देशमुख आमदार झाल्यानंतर वाळू तस्करी बाबत विधानसभा मध्ये जोरदार आवाज उठवला. त्यामुळे सांगोला तहसीलच्या आवारात वाळू तस्करी करणाऱ्या वाहनाना तहसीलच्या आवारात वाहने लावायला सुद्धा जागा नाही एवढी कारवाई करायचे नाटक केले.
त्यानंतर अद्याप गेली महिना झाले कोणत्याही प्रकारची कारवाई दिसत नसून वाळू तस्करी जोमात सुरु असल्याचे चित्र दिसत आहे. याकडे आता आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख कसे लक्ष देणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. सांगोला तालुक्याला नवीन आमदार आल्याने वाळू तस्करी व प्रशासनात काहीतरी बदल होईल असे वाटत होते. परंतु उलट वाळूची तस्करी जोमात असल्याचे तहसील कार्यालयाच्या परिसरात नागरिकांमध्ये चर्चा होताना दिसून येत आहे.