सध्या अलीकडे अपघातांच्या प्रमाणात खूपच वाढ झालेली दिसून येत आहे. अनेक कारणांमुळे म्हणजेच वाहतुकीची वर्दळ, सिग्नल, धूम्रपान करून गाडी चालवणे किंवा अति स्पीड मध्ये गाडी चालविल्याने अपघात घडत आहेत. सध्या अनेक भागात ऊस वाहतूक असल्या कारणाने देखील अनेक अपघात घडत आहेत. आटपाडी तालुक्यातील नळमळा येथे असाच एक अपघात घडलेला आहे. नळमळा येथे ट्रॅक्टरने शौचास गेलेल्या पार्वती दत्तू जाधव (वय ८०) मुळगाव नंदेश्वर भोसे या वृद्ध महिलेस धडक दिल्याने डोक्यास गंभीर मार लागून त्यांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली.
याबाबत नितीन यशवंत मोरे यांनी ट्रक्टर चालक समाधान दादासो पवार याच्याविरुद्ध आटपाडी पोलिसात फिर्याद दिली आहे. मंगळवार सकाळी सहाच्या दरम्यान नळमळा येथे पार्वती दत्तू जाधव ही वृद्ध महिला शौचासाठी डांबरी रोडकडेला बसली असता. त्यावेळी कच्चा पांढऱ्या रस्त्याकडून भरधाव ट्रॅक्टरने वृद्धेस धडक दिली. यात वृद्धेच्या डोक्यास गंभीर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी चालक समाधान पवार याच्या विरुद्ध निरीन मोरे यांनी फिर्याद दिली आहे. अधिक तपास जाधव करीत आहेत.
