सगळीकडेच गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. प्रत्येक मंडळाची गणेशाबाबतची आतुरता सर्वांना दिसून येत आहे. जागोजागी मंडप सजलेले आहेत. तसेच खरेदीसाठी रेलचेल गर्दी पाहायला मिळत आहे. अशातच इचलकरंजी शहरातील विविध गणेशोत्सव मंडळाकडून आगमन मिरवणूकीचे आयोजन करत असल्याचे दिसून येत आहे.
शनिवारी गणरायाचे आगमन होत असले तरी अनेक सार्वजनिक मंडळानी बुधवारपासून गणरायाचे मिरवणूकीने मंडपात आणताना दिसून येत आहे. गुरूवारी दिवसभर अनेक मंडळांनी ढोल-ताशा, झांजपथक अशा पारंपारिक वाद्यामध्ये मिरवणूक काढल्या होत्या.
रात्री उशिरापर्यंत अनेक मंडळांच्या गणेश मूर्तीचे आगमन मिरवणूकीने केल्याने रस्त्यावर गर्दी दिसून येत होती. त्यामुळे वातावरण उत्साहाचे दिसून येत होते. मिरवणूकीमुळे वाहतूक कोंडी होत होती. मात्र, मंडळाचे कार्यकर्ते वाहतूक सुरळीत करताना दिसून येत होते.