इचलकरंजी आगाराचे सध्या दैनंदिन उत्पन्न सुमारे सात ते आठ लाखांच्या घरात आहे. सदर भाडेवाढीमुळे प्रवासी संख्येनुसार दररोज सुमारे एक लाख रुपयांचा महसूल वाढण्याची शक्यता आहे. राज्य परिवहन महामंडळ अर्थात् एस.टी. बस गाड्यांच्या तिकीट दरात १४.९७ टक्के वाढ करण्याचा निर्णय प्राधिकरणाने घेतला आहे. २४ जानेवारीच्या मध्यरात्रीपासून ही भाडेवाढ लागू झाली आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक झळ सहन करावी लागणार आहे. भाडेवाढ करण्याबाबतचे प्रस्ताव एसटी महामंडळ आणि रिक्षा-टॅक्सी संघटनांनी राज्य सरकारला दिले होते. त्यानुसार राज्य परिवहन प्राधिकरणाची बैठक गुरुवारी पार पडली. या बैठकीत भाडेवाढीचा निर्णय घेण्यात आला.
गृह विभागाचे (परिवहन) अपर मुख्य सचिव तथा अध्यक्ष राज्य परिवहन प्राधिकरण यांच्या अध्यक्षतेखाली प्रवासी भाडेदरात वाढ करण्याचा ही बैठक झाली. या बैठकीला राज्य परिवहन प्राधिकरणाचे सदस्य अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) व परिवहन आयुक्त उपस्थित होते. वाहनांसाठी आवश्यक असलेल्या डिझेल, चेसीस, सुभाष भरने टायर या घटकांच्या किमतीत बदल झाल्यामुळे तसेच महागाई भत्त्यात वाढ झाल्यामुळे भाडेवाढ सूत्रानुसार राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांनी १ जानेवारीला महामंडळाच्या बसेसच्या प्रस्ताव सादर केला होता.
त्यानुसार ही भाडेवाढ करण्यात आली. यापूर्वी २६ सप्टेंबर २०११ रोजी भाडेवाढ करण्यात आली होती. हकीम समितीने निश्चित केलेल्या सूत्रानुसार महामंडळाला वाहतूक सेवांच्या महान कार्य विशेष भाई दरामध्ये १४.९५ टक्के वाढ करण्यास मान्यता देण्यात आली. एसटी बस चा प्रवास म्हणजे सर्वसामान्य माणसाचा प्रवास असे म्हंटले जाते मात्र भाडेवाढीमुळे एसटीसाठी अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत.
