बाबर कुटुंबियांनी ठेवला समाजासमोर एक नवा आदर्श….

स्वर्गीय अनिलभाऊ बाबर यांच्या निधनाला 31 जानेवारीला एक वर्ष पूर्ण होते. पण त्यांच्या आठवणी अजूनही अनेकांच्या मनात घर करून आहेत. आमदार स्वर्गीय अनिलभाऊ बाबर यांच्या निधनानंतर बाबर कुटुंबीय प्रचंड दुःखातून गेले. अनिलभाऊंची जबाबदारी त्यांचे सुपुत्र अमोल व सुहास बाबर यांच्याकडे आली. शोभा काकींच्या तसेच त्यानंतर लगेचच अनिलभाऊ यांच्या निधनानंतर प्रचंड तणावाखाली असताना देखील प्रत्येकाला घराबाहेर पडणे कठीण झालं. पण लोकांनी केलेलं प्रेम आणि दिलेला सपोर्ट यामुळे बाबर कुटुंबीय सध्या उभे आहे.

अमोल बाबर यांच्या पत्नी शितलताई बाबर व सुहास बाबर यांच्या पत्नी सोनिया वहिनी बाबर यांनी लोकांसाठी पायाला भिंगरी बांधली. मतदार संघाला कधीही त्यांनी भाऊंची उणीव जाणवू दिली नाही. खरंतर शितलताई आणि सोनिया वहिनी या तशा जावा जावा परंतु त्या कधीही तशा वागल्या नाहीत. बहिणी बहिणी प्रमाणे त्यांचे अतूट नाते राहिले कसलीही गोष्ट असली तरी त्या मैत्रिणींप्रमाणे एकमेकींना सांगतात आणि त्याप्रमाणे पुढे देखील चालतात.

सुहास बाबर यांचा आपल्या आईवर खूप जीव होता एकीकडे आई गेली नंतर वडील गेले हे दुःख ते पचवू शकले नाहीत. परंतु अमोल दादा आणि शितल वहिनी यांनी त्यांना मोठा आधार दिला. अमोल दादा आणि शितलताईंनी कधीही त्यांची उणीव कुटुंबाला जाणवू दिली नाही. सध्या कुठलाही कार्यक्रम असो शितलताई व सोनिया वहिनी या अनेक कार्यक्रमात एकत्र दिसतात. मनात जरी दुःख असले तरी ते दुःख बाजूला ठेवून समाजाप्रती त्या काम करत असतात. लोकांना आनंदी ठेवण्याचा या दोघी प्रयत्न करत असतात. दोघींचे हे अतूट नाते एक आदर्श निर्माण करेल असेच आहे.