जनावरांची अवैध वाहतूक; एकाविरोधात गुन्हा

कोणत्याही प्रकारचा जनावरे (Animals) वाहतुकीचा परवाना न घेता जर्सी गार्योच्या तीन खोंडांची वाहतूक केल्याप्रकरणी विटा पोलिसात गुन्हा या दाखल झाला आहे. विवेक विठ्ठल कांबळे (वय ३९ रा. फुलेनगर ) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयीत आरोपीचे नाव आहे. विटा येथून जर्सी गायीच्या खोडांची कत्तलीसाठी वाहतूक होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून एक पिकअप गाडी ताब्यात घेतली. या गाडीची तपासणी केली असता त्यामधून जर्सी गायीची तीन खोंडे कत्तलीसाठी नेत असल्याची माहिती समोर आली. याप्रकरणी पोलिसांनी विवेक कांबळे याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता सदरची जर्सी गाईयीचे खोंडे कतलीसाठी घेऊन निघाल्याचे स्पष्ट
झाले.