Budget 2025: बजेटनंतर काय स्वस्त होणार? काय महागणार? केंद्रीय अर्थसंकल्पाचं काउंटडाउन सुरू

देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारामन १ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर करणार आहे. अर्थसंकल्पाकडून सर्वसामान्यांना खूप अपेक्षा आहेत. महागाईपासून सर्वसामान्यांना दिलासा मिळावा, अशी इच्छा सर्वांची आहे.बजेटमध्ये सर्वसामान्यांसाठी अनेक घोषणा होण्याची शक्यता आहे. टेक्नोलॉजी सेक्टरमधील अनेक प्रोडक्ट्सच्या किंमती कमी होऊ शकतात. बजेटमध्ये स्मार्टफोनपासून अनेक वस्तूंच्या किंमती कमी होऊ शकतात.

इंपोर्ट ड्युटी कमी करण्याची मागणी

अर्थसंकल्पात स्मार्टफोनच्या किंमती कमी होण्याची शक्यता आहे. स्मार्टफोन प्रोडक्शन कंपनीने सरकारकडे इंपोर्ट ड्युटी कमी करण्याची मागणी केली होती. जर फोनवर लागणारी इंपोर्ट ड्युटी कमी झाली तर आपोआप फोनच्या किंमती कमी होतील. सरकार अर्थसंकल्पान इंपोर्ट ड्युटी कमी करण्याची घोषणा करु शकते.

इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट्सच्या किंमती होणार कमी

बजेटमध्ये मोबाईलशिवाय इतर इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट्सच्या किंमतीदेखील कमी होऊ शकतात. इंडियन सेल्युलर अँड इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशनने टॅक्स कमी करण्याची मागणी केली होती. या प्रोडक्टसमध्ये लागणारे कंपोनेंटवरील टॅक्स कमी करावा. अशी मागणी केली होती. त्यामुळे स्मार्ट टीव्हीसोबत अनेक प्रोडक्ट्सच्या किंमती कमी होणार आहेत.

टेलिकॉम कंपन्याना दिलासा मिळणार

टेलिकॉम कंपन्यांनीही इंपोर्ट ड्युटी आणि लायसन्स फी कमी करण्याची मागणी केली होती. त्यामुळे टेलिकॉम कंपन्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. टेलिकॉम कंपन्या इन्फ्रास्टक्चरवर जास्तीत जास्त गुंतवणूक करु शकतील. त्यामुळे ग्राहकांना चांगली सर्व्हिस मिळेल.