बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत शिल्पाने चाहत्यांचं मनोरंजन केलं. आज शिल्पा बॉलिवूडपासून दूर असली तरी, खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असते. सांगायचं झालं शिल्पाचं प्रोफेशनल आयुष्य नाही तर, खासगी आयुष्य अधिक चर्चेत राहिलं. शिल्पा आता पती राज कुंद्रा आणि दोन मुलांसोबत आनंदी आयुष्य जगत आहे.
पण एक काळ असा देखील होता, जेव्हा शिल्पाचं नाव अनेकांसोबत जोडलं जात होतं.बॉलिवूडमध्ये काम करत असताना शिल्पा शेट्टी आणि अभिनेता अक्षय कुमार यांच्या नात्याच्या चर्चा तुफान रंगल्या. पण अक्षय याच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर शिल्पा पूर्णपणे कोलमडून गेली होती. यावर शिल्पाने एका मुलाखतीत मोठा खुलासा केला होता.
अभिनेत्री म्हणाली होती, ‘अक्षयने माझा फक्त वापर केल. दुसरी व्यक्ती आयुष्यात आल्यानंतर त्याने मला सोडलं… अक्षय माझ्यासाठी कायम खास राहिला, पण असं काही होईल याचा मी कधी विचार देखील केला नाही…’ अक्षयसोबत ब्रेकअप झाल्यानंतर शिल्पाने अनेक अडचणींचा सामना केला.अक्षयसोबत ब्रेकअप झाल्यानंतर शिल्पाच्या आयुष्यात दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांची एन्ट्री झाली. ‘दस’ सिनेमाचं शुटिंग सुरु असताना अनुभव आणि शिल्पा यांचं नातं घट्ट झालं.
पण तेव्हा अनुभव विवाहित असून बाप देखील होता. एक काळ असा देखील होता जेव्हा शिल्पा आणि अनुभव यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा सर्वत्र रंगल्या होत्या. पण मुलाखतीत रंगणाऱ्या चर्चांमध्ये काहीही तथ्य नाही. अनुभव आणि माझ्यात चांगली मैत्री आहे… असं शिल्पा म्हणाली होती. मात्र शिल्पाच्या आयुष्यात एक असं वळण आलं जेव्हा अभिनेत्री यशाच्या शिखरावर पोहोचली. 2007 मध्ये शिल्पाने ‘बिग ब्रदर’ शोमध्या भाग घेतला आणि शो जिंकला.
शो जिंकल्यानंतर शिल्पाने कधीच मागे वळून पाहिलं नाही.शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा याची दुसरी पत्नी आहे. राज कुंद्रा याच्या पहिल्या पत्नीचं नाव कविता असं आहे. राज कुंद्रा आणि कविता यांना एक मुलगी देखील आहे. राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. शिल्पा कायम मुलांसोबत सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.