शेती करत असताना शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची पिके घेतली जातात. तसे पाहायला गेले तर त्यांचा कालावधी हा वेगवेगळा असतो. काही पिकाची लागवड खरीप हंगामात केली जाते तर काहींची रब्बी हंगामात केली जाते. परंतु पिकाची लागवड करताना कोणत्या पिकाला बाजारपेठ कोणत्या वेळेस चांगला भाव असतो, त्याचा अभ्यास करून जर पिकांची लागवड केली तर बाजारपेठेत चांगला भावाचा फायदा मिळू शकतो. या लेखामध्ये आपण अशाच काही पिकांची लागवड केव्हा करावी याबद्दल माहिती घेणार आहोत.
दरवर्षी 15 नोव्हेंबर ते 15 जानेवारी व जूनच्या पहिल्या आठवड्यात काकडी लावावी. म्हणजे जुलै-ऑगस्टमध्ये आणिएनथंडीत काकडी चे पैसे हमखास होतात. महाशिवरात्रीस कांद्याचे रोप टाकून कांद्याची पात गुढीपाडव्याच्या लावावे. म्हणजे उन्हाळ्यात व आषाढी एकादशी पर्यंत पातीचे पैसे होतात.
17 मार्च ते 19 मे हल्लीच्या बदलत्या पावसाच्या हवामानात मृग आणि आद्रा कोरडे जाते, तेव्हा 7 जून पर्यंत दर 8 दिवसांनी पाण्याची उपलब्धता असेल तर 5 ते 10 गुंठे चे कोथिंबिरीचे प्लॉट करावेत. म्हणजे उन्हाळ्यात कोथिंबीरीचे पैसे होतात.
जून-जुलैमध्ये झेंडूची बिया लावून रोप तयार करा. म्हणजेच दसरा-दिवाळीत हमखास झेंडूचे पैसे होतात.
ऑगस्ट महिन्यामध्ये गेल्या वर्षी एप्रिल मे महिन्यात केलेल्या आल्याच्या लागवडी वर्षभर जैविक औषधे सेंद्रिय खते वापरून आले गणपती पासून काढण्यास सुरुवात करावी, म्हणजे आल्याचे पैसे हमखास होतात.
मिरचीची लागवड अशी करावी की उन्हाळ्यात मार्केट मध्ये येईल या पद्धतीने या तंत्रज्ञानाने करावी. म्हणजे या काळात पैसे होतात. हा देशभरातील शेतकऱ्यांचा अनुभव आहे. केळीची लागवड मृगातील असो अथवा कांदेबागातील असो ती एरवी 15 ते 18 महिन्यात येते.टिशू कल्चर ने बारा महिन्यात येते. एप्रिल मे ते जुलै ऑगस्ट आल्याने शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची निश्चितच पैसे मिळतात.
टोमॅटोची लागवड मार्च ते जून डिसेंबर मध्ये पहिला पंधरवड्यात करावी म्हणजे भाव सापडतात. काटेरी भरताची व अंगोरा वांग्याला भाव असतो. परंतु पावसाळ्यामध्ये शेंडे अळीचा प्रादुर्भाव होत असल्याने लागवड करू नये. वांगी दसऱ्यानंतर करावीत वांग्याला चांगला भाव मिळतो.
कोबीचे फेब्रुवारी ते उन्हाळ्यात चांगले पैसे होतात. त्यासाठी दोन महिने अगोदर रोपे लावून लागवड करावी. कोबीचा गड्डा हिरवागार नारळी आकाराचा लांबट गोल एका चौकोनी कुटुंबास पुरेसा होतो. हा गड्डा वजनदार असतो.. कोबी फेब्रुवारीत काढण्यासाठी दिवाळीत लागवड करावी.
फ्लावर ला ऑगस्ट फेब्रुवारी आणि उन्हाळ्यामध्ये मागणी असते. फ्लॉवरचा गड्डा पांढराशुभ्र घट्ट आणि आकार आंब्याच्या झाडाच्या चित्रासारखा गोलसर असावा. वजन 350 ते 600 ग्रॅम असावे अशा गड्यांना भाव जादा मिळतो.