वाळवा तालुक्यातील बहेत ग्रामस्थांचा रास्ता रोको! लेखी आश्वासन दिल्यानंतर …

सध्या अनेक भागात नागरिकांच्या विविध मागण्या असतात त्या पूर्ण न होत असल्याने नागरिक आंदोलनाचा मार्ग अवलंबतात. बहेत नागरिकांनी विविध मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.वाळवा तालुक्यातील बहे येथे सरपंच संतोष दमामे यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. चार ते पाच तास झालेल्या चक्का जाम आंदोलनामुळे रस्त्याच्या दुतर्फा शेकडो वाहने, ट्रक, गाड्या उभ्या होत्या.

येण्या-जाण्याच्या सर्वच रस्त्यांवर चक्काजाम करण्यात आले होते. पोलिस प्रशासनाच्या वतीने आंदोलन मागे घेण्यासाठी संघटनेच्या कार्यकर्त्यांना सनदशीर मार्गाने विनंती करण्यात आली. जोपर्यंत सरपंच, ग्रामसेवक लेखी आश्वासन घेऊन येत नाहीत तोपर्यंत आंदोलनातून माघार घेणार नाही, असा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतल्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. सरपंच संतोष दमामे, ग्रामसेविका एस. एस. माने यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने लेखी आश्वासन दिल्यानंतर रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आले.