सुहास भैया वैभव दादांचे कार्यकर्ते चौकातच भिडले! विट्यात वातावरण टाइट

नागपूर येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत टेंभू योजनेच्या तिसऱ्या सुधारित प्रशासकीय मान्यतेस काल मंजुरी देण्यात आलेली आहे. टेंभू योजनेच्या नव्या 7 हजार 370 कोटी तीन लाख रुपयांच्या खर्चाला ही मंजुरी मिळालेली आहे. विटा शहरासह मतदार संघात फटाक्यांची आतिषबाजी करत या निर्णयाचे जोरदार स्वागत करण्यात आले. आणि साखर वाटप करून हा आनंद असतो साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

ज्यांनी टेंभू योजनेची चेष्टा केली त्यांनीच हा आनंद साजरा केला अशी टीका सुहास बाबर यांनी माजी आमदार सदाशिव भाऊ पाटील गटावर केली आहे. यावेळी सुहास बाबर म्हणाले की त्यांनी त्यांच्या राजकीय आयुष्यात टेंभू योजना पूर्ण करण्याचे जे स्वप्न पाहिले होते ते आज हे स्वप्न पूर्णत्वाने यशस्वी झालेले आहे आणि आता यापुढे या मतदारसंघातील एकही गाव हे टेंभूच्या पाण्यावाचून राहणार नाही असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले.