आज बाबर समर्थकांचा लाडक्या नेत्याला अभिवादन करण्यासाठी उसळणार जनसागर

आज माजी आमदार स्वर्गीय अनिलभाऊ बाबर यांची प्रथम पुण्यसमरण. त्यामुळे आज आपल्या लाडक्या नेत्याला आभिवादन करण्यासाठी अलोट गर्दी पहायला मिळणार आहे. खानापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार टेंभू योजनेचे जनक आमदार स्वर्गीय अनिलभाऊ बाबर यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त गाडीं येथील पवई टेक येथील जीवनप्रबोधिनी  शैक्षणिक संकुलाच्या प्रांगणात पुष्पांजली वाहण्यासाठी राजकीय, सामाजिक, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि प्रशासन यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांसह खानापूर विधानसभा मतदारसंघातील हजारो बाबर समर्थक उपस्थित राहणार आहेत. गार्डी येथील पवई टेक येथील जीवनप्रबोधिनी शैक्षणिक संकुलाच्या प्रांगणात आज शुक्रवार सकाळी साडेदहा वाजता पुष्पांजली वाहण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.