सध्या अनेक भागात विकासकामांचा धडाका सुरु आहे. रस्ते, पाणी, वाहतूक, तसेच अनेक विविध समस्याबाबतीत सोडवणूक सुरु आहे. वाळवा तालुक्यातील भडकंबे येथे खासदार धैर्यशील माने यांच्या फंडातून भडकंबे गावातील यल्लमा मंदिर नूतनीकरण व हॉल कामाचे उद्घाटन झाले. शिवसेना विभाग प्रमुख परशुराम बामणे यांच्या हस्ते पुजन करून उदघाटन करण्यात आले.
खासदार धैर्यशील माने यांच्या विशेष प्रयत्नातून वाळवा शिराळा तालुक्यातील विकास कामांना गती देवू, सामाजिक उपक्रमासह निरनिराळ्या विकास कामांना निधी उपलब्ध करून देण्या बरोबरच केंद्र व राज्य शासनाच्या निरनिराळ्या प्रकारच्या योजनाचा वैयक्तिक लाभ मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख नंदकिशोर निळकंठ यांनी व्यक्त केले.
श्री. नंदकिशोर निळकंठ यांचा सत्कार गावातील सर्व ग्रामस्थ यांच्या वतीने शाल, श्रीफळ, फेटा व बुके देवून
करण्यात आला यावेळी श्री. आनंदराव पाटील, कामेरीचे माजी सरपंच श्री. अमोल पाटील, अमोल सावंत, शिवाजी सदू पाटील, आनंदा कृष्णा पाटील, अमोल मारुती बागणे सुनील बाळू पाटील, संभाजी वडर, संजय दत्तात्रय पाटील यांच्या सह भडकंबे, मालेवाडी, बहादूरवाडी गावातील युवक, ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.