बाळूमामांच्या भंडाऱ्यानिमित्त पेठ येथे आज भव्य धनगरी ओव्यांच्या स्पर्धा

वाळवा तालुक्यातील पेठ येथील बाळूमामा यांच्या भंडाऱ्यानिमित्त शनिवारी, १४ डिसेंबर रोजी बिरुदेव बाळूमामा समाजातर्फे विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. सकाळी बाळूमामांची मिरवणूक काढली. तसेच संध्याकाळी ४ ते ७ वाजेपर्यंत महाप्रसाद आयोजित केला आहे. रात्री ९ वाजता भव्य धनगरी ओव्यांची स्पर्धा घेण्यात आली आहे.
यात प्रथम क्रमांकास २४ हजार, द्वितीय क्रमांकास २१ हजार तर तृतीय क्रमांकास १८ हजारांचे बक्षीस आहे. यासह उत्तेजनार्थ १५, ९, ६ हजारांची बक्षिसे दिली जाणार आहेत. प्रवेश फी ४०० रुपये आहे. अतुल पाटील, यशश्री सेंटिग ग्रुपकडून प्रथम व द्वितीय क्रमांकाचे बक्षीस तसेच मिथुन जांगळे व दीपक मस्के यांच्याकडून तृतीय क्रमांकाचे बक्षीस देण्यात येणार आहे. तरी असंख्य बाळुमामा भक्तांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.