सध्या अनेक भागातील रस्त्यांची दुरावस्था झाल्याचे चित्र पहावयास मिळतच आहे. यामुळे अपघातांच्या प्रमाणात प्रचंड वाढ झालेली आहे. वेळोवेळी रस्ता दुरुस्तीची मागणी देखील केली जाते. सध्या इचलकरंजी- हातकणंगले मार्गावरील कोरोची वळण रस्त्यावर काँक्रीटीकरण कामास प्रारंभ झाला आहे. सध्या रस्त्याच्या दक्षिण बाजूचा रस्ता काँक्रीटीकरण केले जात आहे. यामुळे या वळण रस्त्यावर वाहतूकीची प्रचंड कोंडी होत आहे. परंतु येत्या दोन ते तीन दिवसात एका बाजूचे काँक्रीटीकरण झाल्यानंतर वाहतुकीची कोंडी कायमस्वरुपी संपेल, असे चित्र आहे. वाहनधारकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
