आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी दिला विश्वास! सर्वांची सर्व कामे….

सांगोला तालुक्याचे नूतन आमदार यांनी सर्वसामान्य जनतेचे प्रश्न समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी पुरेपूर प्रयत्न चालू केलेले आहेत. विकासकामांच्या दृष्टीने ते पाऊल टाकीत आहेत. आमदार डॉ. भाई बाबासाहेब देशमुख यांचा महिम ग्रामस्थांच्या वतीने भव्य नागरी सत्कार संपन्न झाला.सत्कार समारंभापुर्वी नुतन ग्रामपंचायत कार्यालयाच्या बांधकामाचा पायाभरणी शुभारंभ आ.डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या शुभहस्ते कुदळ मारुन संपन्न झाला.

मतदार संघातील व मतदार संघाबाहेरील अनेकांनी निवडणुकीसाठी मदत करत जिवाचे रान केले आहे त्यामुळे माझ्या जिवात जीव असेपर्यंत मी कोणालाही अंतर देणार नाही. कित्येकांनी निवडणुकीअगोदर व निवडणुक काळात आपले व्यवसाय, काम धंदा बाजुला ठेवून तहान-भुक हारपुन निवडणुकीत प्रयत्न केले आहेत यांची मला जाणीव आहे. विधानसभा निवडणुकीत माझा विजय सुकर व्हावा म्हणुन प्रत्येकांने काम केले आहे त्यामुळे प्रत्येकाला वाटते माझे काम झाले  पाहीजे अशी अपेक्षा ठेवणे काही गैर नाही परंतु थोडं थांबा सर्वांची सर्व कामे मार्गी लावू, असा विश्वास आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी दिला.
यावेळी आमदार डॉ. भाई बाबासाहेब देशमुख यांनी बोलताना सांगितले की, येणाऱ्या काळात शिक्षण व आरोग्य याकडे मी लक्ष देणार असून महिम गावांमध्ये दुध व्यवसाय खुप मोठा आहे. गावातील दुधाचे संकलन ४० हजार लिटरच्या आसपास आहे. आर्थीक उलाढाल मोठी आहे त्यामुळे महिम गावात एखादी बॅक असणे गरजेचे आहे त्यासाठी प्रयत्न केले जातील तसेच येणाऱ्या काही दिवसातच पशुवैद्यकीय दवाखान्यासाठी गावकऱ्यांनी योग्य ती जागा देण्याचे काम करावे, असे सांगत सत्कार केल्याबदल आभार मानले. 

स्व.आबासाहेबांच्या काळात आपला तालुका शांततामय तालुका म्हणुन राज्यभर परिचीत होता… तीच शांतता गेले दोन ते तीन महिन्यात पुंन्हा प्रस्थापित करण्यास आपण बऱ्यापैकी यशस्वी झालो आहोत. तसेच बेकायदेशीर व्यवसायावर आपण लक्ष ठेवुन आहोत अशा व्यवसायातुन दहशत पसरवणऱ्यांची गय केली जाणार नाही. असे देखील यावेळी आम. बाबासाहेब देशमुख यांनी आपले मत व्यक्त केले.