आरोग्यमित्रांच्या मागण्यांबाबत लवकरच बैठक, अन्यथा १२ फेब्रुवारीपासून….

सरकारकडून अनेक विविध योजना राबविल्या जात आहेत. ज्याचा पुरेपूर लाभ देखील होत असल्याचे दिसून येत आहे.
 एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री योजनेचे महाराष्ट्रातील सर्व आरोग्यमित्र १२ फेब्रुवारी पासून बेमुदत संपावर जाणार आहेत. याबाबत मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, कामगारमंत्री, कामगार आयुक्त महाराष्ट्र राज्य, प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी तसेच कामगार अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.

याबाबत कोल्हापूर येथे शासकीय विश्रामगृहात महाराष्ट्र राज्य आरोग्यमित्र कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांनी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान आरोग्यमित्रांच्या मागण्याबाबत सहाय्य संस्था व राज्य आरोग्य हमी सोसायटी यांच्याशी बैठक घेऊन चर्चेसाठी बोलविण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे १२ फेब्रुवारीच्या संपाआधीच आरोग्य मित्रांच्या मागण्या मान्य होऊन त्यांना न्याय मिळेल, अशी आशा आरोग्यमित्रांना आहेत.