लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत अनेक राजकीय समीकरणे बदललेली सर्वानीच पहिली. अनेक पक्षप्रवेश देखील झाले. अनेकांची नाराजी पहायला मिळाली. तर काहींना विधान परिषदेचा शब्द देण्यात आला. आगामी जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या निवडणुकांकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. खा. धैर्यशील माने यांनी आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन हातकणंगले तालुक्यात जोडण्या लावण्यास सुरुवात केली आहे.
त्यातल्या त्यात भाजपकडून इच्छुक असलेल्यांचा पत्ता कसा कट होईल, याचे पुर्वनियोजन केले जात आहे. याचाच एक भाग म्हणून नुकतेच स्वाभिमानाची नेते राजेश पाटील यांना शिवसेनेत प्रवेश देऊन हातकणंगले किंवा हेरले जि.प. मतदार संघातून भाजपच्या उमेदवारासमोर तगडे आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते. आता पहावे लागेल माजी आ. हाळवणकर काय करतात?