कोल्हापूर जिल्ह्यात अनेक खेळाडू आहेत. त्यांनी कोल्हापूर जिल्ह्याच्या नावात भर घातली आहे. हातकणंगले तालुक्यातील चंदूर येथील विश्वविजेत्या संघातील खोखोपटू वैष्णवी पोवार हिचा सत्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई येथे मुख्यमंत्री दालनात झाला. यावेळी चंदूर येथे आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल व्हावे, या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले.
माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे, आम. डॉ. राहुल आवाडे, हातकलंगले पंचायत समितीचे माजी सभापती महेश पाटील, सरपंच स्नेहल कांबळे, उपसरपंच योगिता हळदे, माजी उपसरपंच संदीप कांबळे, ललिता पुजारी, ग्रा.पं. सदस्या वैशाली पाटील, रोहिणी घोरपडे, सचिन हळदे, सुधाकर कदम, अतुल कांबळे, बजरंग पोवार, खो खो प्रशिक्षक तात्यासो कुंभोजे आदी उपस्थित होते. एमएसबीटीई परिक्षेतील यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निकचे यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक.