रांगोळी येथील ग्रामपंचायतीतर्फे उद्या शुक्रवारी (ता. ८) जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सरपंच संगीता नरदे यांनी ग्रामपंचायतीतर्फे शनिवारी (ता.९) सकाळी साडेसहा वाजता महिला व मुलींच्या मॅरेथॉन स्पर्धांचे आयोजन केले आहे. यामध्ये लहान, मध्यम व खुला गट असणार आहे.
सायंकाळी पाच वाजता गांधी मैदान येथे ‘रंगला खेळ पैठणीचा’ हा होम मिनिस्टर कार्यक्रम होणार आहे. स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकासाठी पैठणी साडी, द्वितीय क्रमांक सोन्याची नथ, तृतीय क्रमांक चांदीची जोडवी, चौथ्या व पाचव्या क्रमांकासाठी व उपस्थित महिलांसाठी लकी ड्रॉ पद्धतीने आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. सूत्रसंचालनासाठी स्टार प्रवाह, सोनी मराठी, झी व कलर्स मराठीचे ॲवॉर्ड विजेते विवेक व वीणा ही जोडी उपस्थित राहाणार आहे. मौश्मी आवाडे, अमृता गाट, सुप्रिया माने, तृप्ती कुंभार, उपसरपंच शिवाजी सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती आहे.