विधानसभा निवडणुकीत आमदार डॉ. राहुल आवाडे यांनी बाजी मारली त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अनेक सर्वसामान्य जनतेच्या समस्या, प्रश्न जाणून घेऊन त्या सोडविण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे. पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूर जिल्हा वार्षिक नियोजन सन २०२५-२६ ची राज्यस्तरीय बैठक पार पडली.
यादीत नांवच समाविष्ट नसलेने इचलकरंजी महानगरपालिकेचा प्रलंबित असलेला १००९ कोटी रुपयांचा जीएसटी परतावा तातडीने मिळावा यासंदर्भात बैठक घेण्यासह इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयासाठी आवश्यक स्टाफ, अत्याधुनिक मशिनरी आणि एमआरआय मशिन उपलब्ध करुन द्यावे, ऐतिहासिक माणगांव येथील राजर्षि छत्रपती शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त स्मारकासाठीचा निधी तातडीने मिळावा आदी विविध प्रश्न पुणे येथील जिल्हा वार्षिक नियोजन राज्यस्तरीय बैठकीत आमदार राहुल आवाडे यांनी परखडपणे मांडले.
या बैठकीमध्ये आमदार राहुल आवाडे यांनी इचलकरंजी शहराशी संबंधित व प्रलंबित प्रश्नांची मांडणी करत हे प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी केली. बैठकीत पालकमंत्री प्रकाश आबिटकर, सहपालकमंत्री माधुरी मि साळ, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
