आपल्यापैकी अनेकजण हे विठ्ठलाचे भक्त आहेत. आज माघ एकादशी निमित्त अनेक वारकरी पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी गावातील पायी दिंडीतून तर काही भक्त हे बस ने प्रवास करून जातात. आज जया एकादशीचे व्रत आहे. हे व्रत केल्याने भूत, पिशाच्च इत्यादीपासून मुक्ती मिळते. असा समज आहे.वारकरी संप्रदायातील महत्त्वाची मानली जाणाऱ्या माघी वारीचा महत्त्वाचा व मुख्य दिवस म्हणजे माघी एकादशी. माघ महिन्यातील या एकादशीचे वारकरी संप्रदायात मोठे महत्त्व आहे .या दिवशी भगवान विष्णूची पूजा करत वारकरी उपवास धरतात.
या एकादशीसाठी लाखो भाविक खेडोपाड्यातून गावोगावातून पांडुरंगाच्या दर्शनाला आले आहेत. पहाटेपासून चंद्रभागेत पवित्र स्नान करण्यासाठी भाविकांनी गर्दी केली आहे .माघी एकादशी निमित्त विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी चंद्रभागेच्या तीरावर हजारोंच्या संख्येने भाविक पोहोचले आहेत. एका मिनिटात अंदाजे 27 च्या आसपास भाविक विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन घेत आहेत.
हरिनामाच्या गजरात भक्तांची मांदियाळी पुन्हा एकदा पंढरपुरात जमली आहे. मंदिर परिसर भक्तांनी गजबजून गेला आहे. पंढरपुरात चंद्रभागेत स्नानासाठी तुडुंब गर्दी झाली आहे.