इचलकरंजीत महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेच्यावतीने आम. राहूल आवाडे यांचा सत्कार

महाराष्ट्र कामगार सेना प्रणित महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेच्या वतीने इचलकरंजीचे आमदार राहुल आवाडे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेच्या वतीने बांधकाम कामगाराचे ऑनलाईन करण्याचे पोर्टल पूर्वीप्रमाणे चालू करावे व सदरची ऑनलाईन प्रक्रिया कामगार संघटनेच्या ऑफिसमधून करण्यास परवानगी मिळावी यासाठी मागण्याचे निवेदन दिल्यानंतर आमदार राहुल आवाडे यांनी बांधकाम कामगाराचे पूर्वीप्रमाणे चे पोर्टल चालू करून बांधकाम कामगारांना कामगार संघटनेचे ऑफिसमध्ये ऑनलाईन करण्यास पूर्वीप्रमाणे परवानगी दिल्याने आमदार राहुल आवाडे यांचा महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेच्या वतीने सर्व पदाधिकाऱ्यांनी सत्कार केला.

भविष्यात ज्या काय बांधकाम कामगाराच्या अडचणी असतील तर  केव्हाही मला हाक मारा मी कामगारांच्या कामासाठी तुमच्या बांधकाम कामगाराच्या पाठीमागे ठामपणे उभे राहून बांधकाम कामगारांना न्याय देऊ व इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील एकही बांधकाम कामगार हक्कापासून वंचित राहणार नाही व ज्या शासनाच्या योजना असतील त्या बांधकाम कामगारांना पदरात पाडून देण्यासाठी भविष्यात मुख्यमंत्री कामगार मंत्री यांच्यासोबत कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे मीटिंग लावून बांधकाम कामगारांना न्याय देण्यासाठी पाठपुरावा करू असे आश्वासन आमदार राहुल आवाडे यांनी दिले.

यावेळी संस्थापक अध्यक्ष राजेंद्र निकम जिल्हा संघटक सद्दाम मुजावर, जिल्हाध्यक्ष केप्पाणा हलगेकर, तालुकाध्यक्ष मेहबूब गवंडी, शहराध्यक्ष वाहिद कातनकर, चंदुर गाव अध्यक्ष बाबू पुजारी, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष बेगम नदाफ, जिल्हा उपाध्यक्ष सलना शेख, शहराध्यक्ष प्रियंका पाटील या सर्व पदाधिकारी उपस्थित होते.