आयपीएल २०२५ च्या ६७ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने गुजरात टायटन्सचा ८३ धावा, इतक्या मोठ्या फरकाने पराभव केला. चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करत चेन्नईने २३० धावांचा डोंगर उभा केला. या दरम्यान चेन्नईकडून डेवाल्ड ब्रेव्हिस (Dewald Brevis) नेशानदार कामगिरी करत अर्धशतक झळवले. ब्रेवीसच्या अर्धशतकाच्या जोरवार चेन्नईने २०० चा आकडा पार केला. प्रतिउत्तरात गुजरात टायटन्स खास काही करू शकले नाही. त्यांचा संघ १८ षटकात सर्वबाद १४७ धावाच करू शकला. या सामन्यात डेवाल्ड ब्रेव्हिसने सुपर किंग्जसाठी एक मोठी कामगिरी केली आहे. गुजरात टायटन्सविरुद्ध डेवाल्ड ब्रेव्हिसने फक्त १९ चेंडूत अर्धशतक ठोकले. काल चेन्नई सुपर किंग्ज या हंगामातील शेवटचा खेळला. चेन्नईसाठी हा हंगाम खूप खराब गेला आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या डेवाल्ड ब्रेव्हिसने गुजरात टायटन्सविरुद्ध १९ चेंडूत अर्धशतक लगावले. त्याच्या या खेळीत त्याने २३ चेंडूंचा सामना करत ५७ धावा चोपल्या. या खेळीत त्याने ४ चौकार आणि ५ षटकार मारले. त्याने आपले अर्धशतक पूर्ण करताच, तो चेन्नईसाठी सर्वात जलद अर्धशतक करणारा संयुक्त दुसरा खेळाडू बनला आहे.
चेन्नई सुपर किंग्जकडून सर्वात जलद अर्धशतक ठोकण्याचा विक्रम सुरेश रैनाच्या नावावर जमा आहे. त्याने १६ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले होते. त्यानंतर तीन खेळाडूंनी १९ चेंडूत आपले अर्धशतक झळकावले होते. मोईन अली, अजिंक्य रहाणे आणि आता देवाल्ड ब्रेव्हिस यांनी १९ चेंडूत अर्धशतकेपूर्ण केली आहेत.
चेन्नई सुपर किंग्जचा मोठा विजय
चेन्नई सुपर किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत २३० धावंचा डोंगर उभा केला होता. चेन्नईकडून आयुष म्हात्रेने जबरदस्त सुरुवात करून दिली होती. त्याने १७ चेंडूत ३४ धावा केल्या आणि तो बाद झाला. त्यानंतर, उर्विल पटेलने १९ चेंडूत ३७ धावा, शिवम दुबेने १७ आणि रवींद्र जडेजाने २१ धावा केल्या. याशिवाय दोन फलंदाजांनी अर्धशतके झळकावली. डेव्हॉन कॉनवेने ३५ चेंडूत ५२ धावा उभारल्या. तर शेवटी, ब्रेव्हिसने आपली जादू दाखवत ५७ धावा करून संघाला २३० धावांपर्यंत पोहोचवले. लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातचा संघ १४७ वर सर्वबाद झाला.