सांगोल्याचे नूतन आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांचा नागरिकांच्या वतीने अनेक भागात सत्कार समारंभ आयोजित करण्यात येत आहे. ते सर्वसामान्य जनतेच्या मागण्या जाणून घेऊन त्या दूर करण्याचा प्रयत्न देखील केला जात आहे. विधानसभा निवडणुकीत विजय प्राप्त करुन शेकापला पुन्हा एकदा यश मिळवून दिल्याबद्दल आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांचा सांगोला तालुक्यातील लोटेवाडी येथे नुकताच सत्कार करण्यात आला.
यावेळी, आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या सत्काराबरोबरच लोटेवाडी गावचे सुपुत्र डॉ. प्रमोद रामचंद्र सरगर यांनी ज्वारीच्या विषयावर पी. एच. डी. मिळवल्याबद्दल त्यांचाही सत्कार लोकप्रिय आमदार डॉ. भाई बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. डॉ. प्रमोद् सरगर यांनी ज्या विषयावरची प्रमोदने पीएचडी मिळवली आहे त्याचा फायदा नक्कीच आपल्या देशाला व राज्याला होईल. लहानशा गावात जन्म घेऊन एवढी मजल मारुन उच्च शिक्षण घेणे हे कांही कमी नाही. शहरी भागातील विद्यार्थ्यांना अनेक सुविधा असतात. परंतु शिक्षणाची सुरुवात जिल्हा परीषद शाळेत करुन आज शास्त्रज्ञ म्हणून उदयास येणे ही सोपी गोष्ट नाही. परंतु चिकाटी व जिद्द असेल तर, कांहीही नाही, हे प्रमोदने दाखवून दिले आहे. डॉ. प्रमोद यांनी इथेच न थांबता पुढील शिक्षणासाठी आणखीन पुढे प्रयत्न चालू ठेवावेत.
शिक्षणासाठी परदेशी जावे लागले तर,त्यांना स्कॉलर्शिप मिळवून देण्यासाठी सुध्दा प्रयत्न केले जातील. प्रमोद सरगर यांचा आदर्श इतरही विद्यार्थांनी व कुटुंबांनी घ्यावा, असे आवाहन करुन आज या ठिकाणी माझाही सत्कार करण्यात आला. या ठिकाणाहून इथल्या माय बाप जनतेने माझ्या निवडणुकीमध्ये भरघोस मतांचा आशिर्वाद मला दिला आहे व माझा विजय सुकर केला आहे. त्यामुळे साहजिकच लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.
आपण माझ्यावर टाकलेल्या विश्वासाला येणाऱ्या कधीही तडा जाऊ देणार नाही. कांही लोक आपल्यामध्ये दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न करतील, त्याकडे दुर्लक्ष करा. मी स्व. आबासाहेबांच्या विचारांचा घेतलेला वसा कधीही विसरणार नाही, अशी ग्वाही यावेळी आमदार डॉ. भाई बाबासाहेब देशमुख यांनी दिली.
लोटेवाडी येथील विद्यमान ग्रा.पं. सदस्य दादासाहेब सावंत याच्या वतीने आमदार डॉ.बाबासाहेबांचा दुसरा सत्कार समारंभ भिमगनर येथे संपन्न झाला. यादरम्यान, दलीत समाजातील विविध प्रश्नांबाबत चर्चा करण्यात आली. दलीत वस्तीतील कोणत्याही कामांना निधी कमी पडू | देणार नसल्याचे आश्वासन आमदार डॉ. बाबासाहेबांनी यावेळी दिले. उपस्थित नागरिकांनी मोरे वस्ती काटे वस्ती, देशमुख वस्तीवरील लाईटचे डी.पी. गेले दोन महिने बंद असल्याचे निदर्शनास आणुन दिले.
तेंव्हा संबंधित अधिकाऱ्यांना ताबडतोब फोन लावून आमदार डॉ. बाबासाहेबांनी बंद डीपीबाबत विचारणा केली असता, सदर डीपी लवकरच बसवले जातील, असे सांगीतले गेल्याने सत्काराच्या कार्यक्रमातही कामाचा निपटारा केल्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
–
