सांगोला तालुक्यातील सक्रिय- माजी सैनिक कल्याणकारी संघटनेचा सहाव्या वर्धापन दिनाचे आयोजन सोमवार दि. १८ डिसेंबर २०२३ रोजी रामकृष्ण व्हिला वाढेगाव रोड सांगोला येथे सकाळी १० वाजता करण्याचे आयोजन केले आहे.वर्धापन दिनाचे औचित्य साधून वीर माता पिता, वीर पत्नी तसेच युद्धामध्ये सहभागी झालेल्या माजी सैनिकांचा सत्कार करण्याचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमास सोलापूर जिल्हा कल्याण अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी, पोलीस स्टेशनचे अधिकारी, स्टेट बँक ऑफ इंडिया चे मॅनेजर, जत कवठेमंकाळ आणि शेटफळ फाटा सीएसडी कॅन्टीन चे मॅनेजर व्यंकटेश्वरा ॲग्रो पॉवर अँड प्रोसेसिंग चे अधिकारी इत्यादी मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.तरी सर्व माजी सैनिकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन माजी सैनिक कल्याणकारी संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.