खरसुंडी सिद्धनाथ मंदिरात पारधी पौर्णिमा उत्साहात

सध्या अनेक भागात यात्रा सुरु आहेत. त्यामुळे अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. आटपाडी तालुक्यातील खरसुंडी येथील श्री सिद्धनाथ मंदिरामध्ये पारधी पौर्णिमा सोहळा मोठ्या उत्साहात साजरी झाली. याबाबत अधिक माहिती अशी प्रतिवर्षी पौष पौर्णिमेला श्री सिद्धनाथ काशी क्षेत्राकडे शिकारीसाठी प्रस्थान करतात व माघ पौर्णिमेला परत येतात अशी परंपरा आहे. त्यानुसार दि. ११ रोजी पारधी पौर्णिमेनिमित्त मुख्य मंदिरात अश्वारूढ पूजा बांधली होती. ठिकाणीच्या भाविकांनी खरसुंडीत गर्दी केली होती. परंपरेनुसार प्रतीकात्मक शिकार करण्यात आली.

त्यानंतर गावाच्या वेशीपासून शिकार सवाद्य मिरवणुकीने धुपारतीसह मंदिरात आणण्यात आली. त्या ठिकाणी परशुराम पारध्यांच्या वंशजांनी मानाचा नैवेद्य तयार केल्यानंतर पालखी सोहळ्यास सुरुवात झाली. मुख्य मंदिरातून पालखी हनुमान मंदिराजवळील पटांगणात आल्यानंतर त्या ठिकाणी श्रीच्या पुजाऱ्यांच्या उपस्थितीत सर्व सेवेकरी व मानकरी यांना मानाचे विडे वाटप केले. त्यानंतर जोगेश्वरी मंदिरास प्रदक्षिणा घालून उत्तर रात्री पालखी मुख्य मंदिरात परत आली. दि. १२ रोजी सकाळी धूप आरती वेळी हनुमान मंदिराजवळ सर्व मानकऱ्यांना पारध वाटप करण्यात आली.