जनसुराज्यशक्ती पक्षाने भाजपकडे लोकसभेसाठी जागांची कोणतीही मागणी केलेली नाही किंवा एकही जागा लढवणार नाही, अशी जाहीर भूमिका जनसुराज्यशक्ती पक्षाचे संस्थापक व आमदार डॉ. विनय कोरे यांनी मिरज येथील पक्षाच्या संवाद मेळाव्यात घेतल्याने हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून विनय कोरे निवडणूक लढविणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
दीड वर्षापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशावरून कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही खासदारांची विनय कोरे यांनी मध्यस्थी करून त्यांचा शिंदे गटातील प्रवेश निश्चित केला होता.
वारणा परिसरातील दहा गावांत खासदार धैर्यशील माने यांनी केलेला संपर्क दौरा व त्या दौर्यात स्वागतासाठी कोरेंच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती धैर्यशील माने यांच्या उमेदवारीबाबत अनुकूल दिसते.
