आमदार जयंतराव पाटील यांची मियासाहेब दर्ग्यास भेट, उर्वरित काम देखील लवकरच पूर्ण करण्याचे आश्वासन

सध्या अनेक भागात विविध विकासकामे म्हणजेच रस्ते दुरुस्ती, पाणीप्रश्न अनेक ठिकाणची अनेक अपूर्ण, रखडलेली कामे पूर्णत्वास नेण्यास सुरुवात झालेली आहे. अनेक नेतेमंडळीकडून नागरिकांचे प्रश्न, समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्याचा प्रयत्न सुरु आहे. आमदार जयंतराव पाटील यांनी वाळवा तालुक्यातील बागणी येथील पीर मियांसाहेब दर्ग्यास भेट देऊन आशीर्वाद घेतले यावेळी त्यांचा चांदसो इनामदार, कयुम चौगले, मुस्ताक मुल्ला, नौशाद मुल्ला यांनी शाल, हार, श्रीफळ देऊन स्वागत केले. यावेळी आम. पाटील म्हणाले पीर मियांसाहेब दर्गा हा फार जुना आहे. याला ऐतिहासिक महत्व देखील आहे.

या ठिकाणी भाविक मोठ्या श्रद्धाने येत असतात. त्यांना सोई सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी देऊ भाविकांची सोय चांगली करू. सध्या या भागात सुशोभिकरण चांगले झाले आहे. उर्वरित काम देखील लवकरच पूर्ण करून देऊ. यावेळी येथील सोई सुविधा बाबत कयुम चौगले यांनी सूचना मांडल्या.