वस्त्रनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इचलकरंजी शहरात सध्या विकासकामे सुरु झाली आहेत. रस्ते, वाहतूक, पाणी, पार्किंग याबाबतीत समस्या सोडविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने घरफाळा व पाणीपट्टी वसुलीची धडक मोहीम राबवली जात आहे. चालू आर्थिक वर्ष संपत आले, तरी अद्याप घरफाळा वसुलीचे उदीष्ट साध्य होत नसलेने थकित घरफाळा वसुलीसाठी महापालिकेच्या वतीने पाच पथकांची निर्मिती केली होती. वसुलीसाठी प्रथम पन्नास हजार पेक्षा जास्त कर थकवणाऱ्या मिळकत धारकांवर कारवाईचा बडगा उचलला जात आहे.
सदर ५ पथकांच्यावतीने १ ते १२ फेब्रुवारी अखेर एकूण १११ मिळकत धारकावर जप्तीची कारवाई केली आहे. तर ९५ मिळकत धारकांचे नळ कनेक्शन बंद करण्यात आले आहे. सदरची कारवाई सुरू झाल्यापासून अनेक मिळकत धारकांनी आपली घरफाळ्याची थकीत रक्कम भरण्यास सुरुवात केली आहे. परंतू अनेक मिळकत धारकाने अद्याप कराची रक्कम भरली नाही अशा मिळकत धारकांवर यापुढे कडक कारवाई करण्याचा इशारा महापालिकेच्या कर विभागाकडून देण्यात आला आहे.
इचलकरंजी महानगरपालिकेच्या कर विभागाकडून थकीत घरफाळा व पाणीपट्टी वसुलीची धडक मोहीम राबविण्यात येत आहे. फेब्रुवारी महिन्याच्या १२ तारखेपर्यंत एकूण १११ मिळकती जप्त करण्यात आल्या असून ९५ मिळकतींचे नळ कनेक्शन तोडण्यात आले आहे. महानगरपालिकेच्या वतीने घरफाळा व पाणीपट्टी वसुलीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कसोशीने प्रयत्न सुरू असून थकबाकीदारावर कठोर कारवाई करण्याची भूमिका महापालिकेच्यावतीने घेण्यात आली आहे.
