आष्टा शहरातून शंभर घोडागाडी, बैलगाडी चिंचणी मायाक्का यात्रेला रवाना…

सध्या अनेक भागातील यात्रा सुरु आहेत. भाविक यात्रेसाठी खूपच गर्दी करतात. परगावाहून अनेक भाविक गावाकडे येतात. कर्नाटक चिंचली येथील श्री मायक्का देवीच्या यात्रेसाठी अनेक भाविक येत असतात. महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कर्नाटकातील श्री मायाक्का देवीची यात्रा १२फेब्रुवारी ते १७फेब्रुवारी दरम्यान होतं आहे. शेकडो वर्षांपासून आष्टा शहरातील भाविक यात्रेसाठी आपल्या बैलगाडीतून जातात. आष्टा शहर व परिसरातील नागरिकांना कर्नाटक चिंचली येथील श्री मायक्का देवीच्या यात्रेचे वेध लागले आहेत.

आष्टा शहरातील भाविक आपल्या बैलगाड्या सजवून बैलांना शिंग्या, मखमली झुल चढवून, ढोल कैताळाच्या गजरात संवाद्य मिरवणूकीसह चिंचलीकडे रवाना झाले. यावेळी वैभव शिंदे युवा मंचच्यावतीने मिठाई, पाणी वाटप झाले. अनेकांनी खास यात्रेसाठी लाख लाख रुपयांची बैले खरेदी केली आहेत.भाविकांची गाडी बांधण्यासाठी, तट्टया उभा करण्यासाठी, बैल सजवण्यासाठी लगबग सुरु होती. सायंकाळी सर्व बैलगाड्या, घोडागाड्या धनगर गल्ली येथे जमा झाल्या. तेथून निशाण, ढोल, कैताळ, हलगी वाद्यात मिरवणूकीला सुरवात झाली. अनेक महिला मिरवणुकीत सहभागी झाल्या.

धनगर गल्ली, दररोजबुवा चौक, कोटेश्वर मंदिर, सावळवाडे गल्ली, मिरजवेस गल्ली या मार्गांवरून गाड्या निघाल्या. वैभव शिंदे युवा मंचच्या वतीने यात्रेसाठी मिरजवेस येथे मिरवणूकीची सांगता झाली. येथे जाणाऱ्या भाविकांना पाणी, व सुकी मिठाई, लाडू वाटप झाले. रात्री घोडा गाड्यांची मिरवणूक झाली. भाजपाचे प्रवीण माने, राष्ट्रवादीचे शिवाजी चोरमुले, अमित ढोले, माणिक शेळके, चैतन्य ढोले, बाबासो सिद्ध, संभाजी शेळके, अर्जुन माने, काशिनाथ ढोले, भगवान ढोले, सचिन रासकर यांनी स्वागत करीत निरोप दिला. साठ घोडागडी, पंचवीस बैलगाडीसह कुटुंब कबील्यासह सह भाविक यात्रेसाठी रवाना झाले. आष्टा ते चिंचली ऐंशी किलोमीटरचा तीन टप्प्यातील प्रवास करीत रविवारी मुख्य दिवशी बोनी नैवेद्य होईल. सातव्या दिवशी गाड्या गावी येतील.