सध्या अलीकडच्या काळात गुन्हेगारीच्या तसेच अवैध धंद्यात वाढ झाल्याचे चित्र आहे. तसेच सध्या सरकारी कामांमध्ये देखील हलगर्जीपणा दिसून येत आहे. असाच प्रकार कोरोची येथे उघडकीस आला आहे. कोरोची येथील तलाठी राजाराम जाधव हे शासकीय परिपत्रकाचा अवमान करत असून नागरिकांनी मागणी केलेले अभिलेख दाखवण्यास नकार देत आहेत. जाधव हे कार्यालयामध्ये वेळोवेळी गैरहजर असतात.
तसेच इतरत्र जात असताना हालचाल रजिस्टरमध्ये नोंदी न करता जातात. हे कृत्य बेकायदेशीर असल्याने त्यांच्यावर शासन नियमानुसार शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी मिनाज सनदी यांनी प्रांताधिकारी इचलकरंजी कयांच्याडे केली आहे.महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने माहिती अधिकारामध्ये अपिलांची वाढ होत असल्याने अभिलेख त्याम तलाठी कार्यालयमधील अभिलेख प्रत्येक सोमवारी पाहण्यासाठी नागरिकांना उपलब्ध करून देण्याचे आदेश काढण्यात आले होते. त्यानुसार मिनाज सनदी यांनी तलाठी कार्यालयाकडे अर्ज करून अभिलेख उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. परंतु तलाठी राजाराम जाधव यांनी सनदी यांनी मागणी केलेले अभिलेख उपलब्ध करून न देता त्यांना अपमनास्पद वागणूक दिली. त्यानंतरही वारंवार सनदी यांनी अभिलेखांची पाहणी करण्याकरिता लेखी मागणी प्रत्येक सोमवारी केली असता जाधव सदरचे अभिलेख उपलब्ध करून देण्यास नकार दिला.
मिनाज सनदी यांनी प्रांताधिकारी मोसमी चौगुले यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला असून राजाराम जाधव यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच तलाठी जाधव हे कार्यालयामध्ये गैरहजर असतात.शासनाने नेमून दिलेल्या वेळेमध्ये कार्यालय बंद करताना नियमानुसार हालचाल रजिस्टरमध्ये नोंद करणे आवश्यक असते. त्याप्रमाणे जाधव हे हालचाल रजिस्टर मध्ये कोणतीही नोंद करत नाहीत, असा आरोप ही निवेदनामध्ये सनदी यांनी केला आहे.