हातकणंगले विधानसभा मतदारसंघाबाबतीत आमदार विनय कोरे ठाम

सध्या विधानसभा निवडणुकांच्या तयारीला प्रत्येक पक्ष जोमाने कामास लागलेला पाहायला मिळत आहे. अनेकजण आपापल्या उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. परंतु कोणत्या पक्षातून कोणाला उमेदवारी मिळणार याबद्दल तर्कवितर्क देखील लावण्यात येत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांची प्रत्येक मतदारसंघात गर्दी पाहायला मिळतच आहे. अशात हातकणंगले विधानसभा मतदारसंघात देखील अनेक इच्छुक आहेत.

जनसुराज्य शक्ती पक्षाला हातकणंगले विधानसभा मतदारसंघ मिळायलाच हवा यावर आमदार विनय कोरे ठाम असल्याने या मतदारसंघांमध्ये मित्र पक्षांची हवा टाईट होत चाललेली दिसत आहे. येत्या काही दिवसांमध्ये जनसुराज्य शक्तीला ज्या काही जागा मिळतील त्यामध्ये हातकणंगले असणार आहे हे निश्चित मानले जात आहे. पक्षाचे नेते सुमित कदम यांनी त्या दृष्टीने पाऊल उचलले आहे असे सध्या मानले जात आहे.