विटा शहरातील वाढत्या गुन्हेगारी संदर्भात मुख्यमंत्र्यांना भेट घेणार : ब्रह्मानंद पडळकर

सध्याच्या काळात गुन्हेगारीच्या प्रकारात वाढ झालेली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पहायला मिळत आहे. विटा शहरात ड्रग्ज प्रकरण उघडकीस आल्यानंतर नागरिक धास्तावले आहेत. विटा. जिओ मराठीचे पत्रकार प्रसाद पिसाळ यांचेवर मागील चार दिवसापूर्वी झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या निषेधार्थ सांगली जिल्हा पत्रकार संघटनांच्या वतीने विटा येथे महा मोर्चाचे आयोजन केले होते. या मोर्चाला सांगली जिल्हा समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर साहेब यांनी भेट दिली .यावेळी भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष संदीप तात्या ठोंबरे सांगली जिल्हा सचिव पंकज भैया दबडे विद्यार्थी आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष निलेश पाटील सागर चवरे साम्राज्य मुकेश पंडित मास्टर सयाजी सकट यावेळी उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर म्हणाले की, पत्रकार हा लोकशाही वरचा चौथा स्तंभ आहे. हा पत्रकारावर हल्ला नसून हा लोकशाही वर झालेला मोठा हल्ला आहे. त्यामुळे लोकशाही आणि पत्रकारिता जिवंत ठेवण्यासाठी रोज होणाऱ्या घडामोडी या सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी पत्रकार हा फार मोठा दुवा म्हणून काम करत आहे. अशा पत्रकारांच्यावर हल्ले होणे हे भूषणावह नाही.

आटपाडी खानापूर तालुक्यात आणि विटा शहरात वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्याने योग्य पावले उचलून त्यांचा कडक बंदोबस्त करावा. आपणास तालुक्यातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी आम्ही व आमचे सर्व कार्यकर्ते यांची नेहमीच पोलिसांना साथ राहील. यासंदर्भात योग्य उपाय योजना लवकर नाही केल्यास वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची भेट घेऊन त्याला आळा घालण्याची मागणी करणार असल्याचे समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी सांगितले.