विटा अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटी व्हा. चेअरमन पदी बिनविरोध निवड, इथुन पुढच्या काळात असेच काम करीत राहण्याची ग्वाही…  

विटा शहरात सध्या अवैद्य धंदे तसेच गुन्हेगारी खूपच वाढलेली दिसून येत आहे. त्यामुळे जनतेत भीतीचे वातावरण पहायला मिळत आहे. विटा अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटी लि, विटा या संस्थेच्या व्हा. चेअरमन पदाची निवडणुक नुकतीच पार पडली. व्हा.चेअरमन पदी श्री. बादशहा इनामदार यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करणेत आली. या निवडीच्या कार्यक्रमासाठी संस्थेचे संस्थापक मा. आमदार अॅड. श्री. सदाशिवराव (भाऊ) पाटील तसेच संस्थेचे चेअरमन खानापुर मतदार संघाचे युवा नेते अॅड. श्री. वैभव (दादा) पाटील उपस्थीत होते.

संस्थेचे संचालक श्री. सचिन राजमाने यांनी व्हा. चेअरमन पदासाठी श्री. बादशहा इनामदार यांची सुचना केली व त्यास संस्थेचे संचालक श्री. मधुकर सुर्यवंशी यांनी अनुमोदन दिले अध्याशी अधिकारी म्हणुन सहाय्यक निबंधक विटा श्री. विलास कोळेकर यांनी काम पाहिले. सदर निवडीस संस्थेचे संचालक श्री. जनार्दन देवकर, सचिन शिंदे, मधुकर सुर्यवंशी, भरत कांबळे, सचिन राजमाने, नाथा माने, प्रशांत सावंत, अरुण टिंगरे, चंद्रकांत पाटील, अक्रमअली शिकलगार उपस्थित होते. त्याच बरोबर संस्थेचे जनरल मॅनेजर श्री. सतिश पाटील व सर्व शाखांचे शाखाधिकारी यांचे उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.

नवनिर्वाचित व्हा. चेअरमन श्री. बादशहा इनामदार यांचा सत्कार संस्थेचे संस्थापक मा. आमदार अॅड.श्री. सदाशिवराव (भाऊ) पाटील यांचे वतीने करणेत आला त्याच बरोबर अध्याशी अधिकारी म्हणुन सहाय्यक निबंधक विटा श्री. विलास कोळेकर यांचा सत्कार संस्थेचे चेअरमन खानापुर मतदारसंघाचे युवा नेते अॅड. श्री. वैभव (दादा) पाटील यांचे हस्ते करणेत आला.

संस्थेचे व्हा. चेअरमन यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करीत असताना गेली २० वर्षे झाली मी या संस्थेचा संचालक असुन संस्थेने माझे वरती विश्वास दाखवुन मला व्हा. चेअरमन पदाची संधी दिले बद्दल मी संस्थेचा ऋणी व  आभारी आहे. इथुन पुढच्या काळात असेच काम करीत राहीन याची त्यांनी ग्वाही दिली.