विटा बस स्थानकावरून वृद्धेची बोरमाळ पळवली

विटा(Vita) बस स्थानकावर बसमध्ये चढत असताना सत्तरवर्षीय वृद्ध महिलेची एक लाख रुपये किमतीची सोन्याची बोरमाळ चोरटयांनी लंपास केली. ही घटना मंगळवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली .

मादळमुठी (ता.खानापूर) येथील शोभा दादासाहेब माळी या मंगळवारी बसमध्ये चढत असताना चोरटयांनी त्यांच्या गळ्यातील एक तोळ्याची सोन्याची बोरमाळ नसल्याचे लक्षात येताच त्यांनी बसमध्ये शोधाशोध केली, बस विटा पोलिस ठाण्यात आणण्यात आली , परंतु हाती काही लागले नाही. पोलिसांनी वृद्धेस फिर्याद देण्यास सांगितले. एकमेव गाडी असल्याने वृध्दा ‘ उद्या तक्रार देते ‘ असे सांगून बसमधून निघून गेली.