१२ तास गीत गाऊन केले ग्रेट इंडियन बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये नोंद

सांगोला, हार्मनी इव्हेंट्स आणि सौ. आरती दीक्षित,यांच्या संकल्पनेतून ग्रेट इंडियन बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये नोंदणी साठी हा कौतुकास्पद उपक्रम राबविण्यात आला. सदर कार्यक्रम हा पुणे येथे हार्मनी इव्हेंट्स स्टुडिओ डैकन जिमखाना. या ठिकाणी यशस्वी रित्या संपन्न झाला. सदर उपक्रमात महाराष्ट्रातील विविध जिल्हा मधुन १८ गायक सहभागी होऊन गीत सादर केले. हा रेकॉर्डस् रविवार दिनांक १३ जुलै रोजी. सकाळी ९ वाजता ग्रेट इंडियन बुक

तर कार्यक्रम ची सांगता. सायंकाळी ९.वाजुन १५ मिनिटांनी झाली. सहभागी सर्व गायकांना सौ. आरती यांच्या हस्ते मेडेल व डॉ . इंद्रजीत यांच्या हस्ते रेकॉर्डस् प्रमाणपत्र देऊन सन्मानीत करण्यात आले. सदर कार्यक्रमास अमोल देव, अपुर्वा देव. यांचे विषेय श्रमदान लाभले तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. राजा भाऊ तीखे यांनी केले.