Kriti Sanon Wedding : क्रिती सेनन लवकरच अडकणार लग्नबंधनात?

अभिनेत्री क्रिती सेननआणि कबीर बाहिया एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून उधाण आलं आहे. दोघांना अनेक फंक्शन्समध्ये एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे. त्यांचे फोटो, व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झालेत. आता लवकरच हे दोघं लग्न करणार असल्याचं बोललं जातंय. त्यांचा आणखी एक नवा व्हिडीओ व्हायरल होतोय ज्यामुळे लग्नाच्या चर्चांना आणखी हवा मिळाली आहे.

क्रिती आणि कबीर दोघेही नवी दिल्ली विमानतळावर एकत्र स्पॉट झाले. अभिनेत्री कबीरच्या कुटुंबाला भेटण्यासाठी येथे आली असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे लग्न ठरण्याची शक्यता आहे. विमानतळाबाहेर पडतानाचा त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते डेट करत असून आता लग्न करणार असल्याचं बोललं जातंय.

क्रिती किंवा कबीर दोघांनीही त्यांच्या नात्याची अधिकृतपणे पुष्टी केलेली नसली तरी, त्यांच्या वारंवार परदेशी सुट्ट्यांमुळे अफवांचा धुमाकूळ सुरूच आहे. गेल्या महिन्यातच, हे जोडपे भारतीय क्रिकेटपटू एमएस धोनी, त्याची पत्नी साक्षी धोनी, कृतीची बहीण नुपूर सेनन आणि तिचा कथित प्रियकर कबीर आणि संगीतकार स्टेबिन बेन यांच्यासोबत ख्रिसमस साजरा करताना दिसली.

कबीर बाहिया, यूके-स्थित बिझनेसमॅन आहे. लंडनमधील एका श्रीमंत कुटुंबातील असून, त्यांचे वडील कुलजिंदर बाहिया यांनी साउथॉल ट्रॅव्हलचे संस्थापक आहेत. कबीर हा भारतीय क्रिकेटपटू एमएस धोनीच्याही जवळचा आहे. तो धोनीचा मेहुणा असल्याचं समोर येतंय. त्यामुळे आता क्रिती लवकरच लग्नगाठ बांधणार आहे का? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे.

दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून अभिनेत्री क्रिती सेनन तिच्या वैयक्तिक आणि खाजगी आयुष्यामुळे चर्चेत असते. क्रिती सेनन लवकरच धनुषसोबत ‘तेरे इश्क में’ या चित्रपटात काम करणार आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी अलिकडेच या सिनेमाचा एक टीझर रिलीज केला होता.