आटपाडी खानापूर २८६ मतदार संघातून आमदार सुहास बाबर यांनी मोठे मताधिक्य घेऊन विजय मिळवला. निवडूनिकी आगोदर खानापूर आटपाडी तालुक्यातील अनेक मान्यवर व गावांनी शिवसेना शिंदे गटा मध्ये पक्ष प्रवेश केले. मात्र निवडणूक होऊन ही पक्ष प्रवेश मालिका सुरूच आहे. दि. १ डिसेंबर रोजी आटपाडी तालुक्याचे नेते सांगली जिल्हा बँकेचे संचालक मा. तानाजीराव पाटील (अध्यक्ष) यांच्या उपस्थिती मध्ये खांजोडवाडी गावचे युवा नेते सचिन सूर्यवंशी, भाऊ सूर्यवंशी, विकास सूर्यवंशी, संतोष सूर्यवंशी, गणेश सूर्यवंशी, पोपट सूर्यवंशी, अशोक सूर्यवंशी, अविनाश चव्हाण, राजेंद्र सूर्यवंशी या सर्व मान्यवरांनी शिवसेना (शिंदे) गटात जाहीर पक्षप्रवेश करून गाव एकत्रित राहण्याच्या व विकास कामाच्या दृष्टीने हा पक्ष प्रवेश केला असे पक्ष प्रवेश मान्यवर यांनी सांगितले.
आटपाडी येथे श्री राम कॉलेज येथे हा सोहळा संपन्न झाला. पक्षप्रवेश सोहळ्या प्रसंगी उपस्थित शिवसेना तालुकाप्रमुख साहेबराव पाटील मनोज नांगरे पाटील रामदास सूर्यवंशी शंकर बापू चव्हाण रमेश सूर्यवंशी राजेश नांगरे विठ्ठल पूकळे संजय सूर्यवंशी तुकाराम सूर्यवंशी प्रसाद सूर्यवंशी बाबुराव सूर्यवंशी हनुमंत मगर आदी मान्यवर उपस्थित होते.