जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वक्तव्यांवर माजी मंत्री जयंत पाटील व त्यांच्या कार्यकर्त्यांनी आक्षेपार्ह भाष्य केले. इस्लामपूर व जत येथे पडळकर यांच्या प्रतिमेला जोडे मारले. या पार्श्वभूमीवर आटपाडीत कार्यकर्त्यांनी जयंत पाटील यांच्या कार्यकर्त्यांचा निषेध करत पडळकर यांना समर्थन देत पडळकर यांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक केला.
शनिवारी सकाळी आटपाडी नगरपंचायतीसमोर भाजप कार्यकर्त्यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक करून केला. पडळकर यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या.आंदोलनात भाजपचे जिल्हा युवक अध्यक्ष अक्षयराज माने, जयवंत सरगर, विष्णुपंत अर्जुन, आटपाडी युवा अध्यक्ष उमाजी चव्हाण, सोमश्वर सरगर, सचिन सरगर, अनिल हाके, उमेश अनुसे, विकास भुते, भगवान दाईंगडे, सुहास देशमुख, माजी सरपंच मोहन पडळकर, जीवन कासार, प्रवीण माने यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी जयंत पाटील व त्यांच्या समर्थकांचा निषेध करत, आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर झालेल्या टीकेविरोधात ठाम भूमिका व्यक्त केली. दुग्धाभिषेक आणि घोषणाबाजी करत परिसर दाणाणून सोडला.
