सध्या छोट्या मोठ्या कारणांवरून वादावादी होते पण हि वादावादी काही वेळा खूपच मोठे रूप धारण करते. शेत जमीन पाण्यावरून भांडणे होत राहतात. काही वेळा हि भांडणे पोलीस ठाण्यापर्यंत जातात. हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली येथे चक्क पोलीस ठाण्याच्या आवारातच हाणामारी झाल्याने एकच चर्चा होऊ लागली आहे.
पट्टणकोडोली येथे एका मेंढपाळाने शेतकऱ्याच्या शेतातील पिकांचे नुकसान करुन त्यालाच मारहाण केली. याबाबत संबंधीत शेतकरी आपल्या नातेवाईकांसह हुपरी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आले असता मेंढपाळाने आपला पोलीस दलातील भाऊ याच्या मदतीने पुन्हा त्या शेतकरी व त्याच्या भावास शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. पोलीस ठाण्याच्या आवारातच हाणामारी झाल्याने याची जोरदार चर्चा नागरिकांच्यात सुरु आहे.
