दहावीचा मराठी पेपर १५ मिनिटांत फुटला, २० रुपयांत झेरॉक्स वाटल्या!

आजपासून राज्यात दहावीच्या परीक्षेला सुरूवात झाली. आज मराठीचा पेपर होता. जालन्यामध्ये कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडाला आहे. जालन्यातली बदनापुरमध्ये प्रश्न पत्रिक फुटली आहे. लोकांनी त्याची झेरॉक्स काढून विद्यार्थ्यांना उत्तरे पुरवली आहे.बदनापूर येथील परीक्षेच्या ठिकाणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

दहावीच्या बोर्डाची परीक्षा सुरू झाल्यानंतर पहिल्या १५ मिनिटांत मराठीचा पेपर फुटला. शहरातील झेरॉक्स सेंटरवर अवघ्या २० रूपयांत प्रश्न पत्रिकेची झेरॉक्स मिळत होती.

जालन्यात पहिल्याच दिवशी दहावीच्या परीक्षेला ग्रहण लागले आहे. जालन्यामध्ये पेपर फुटल्यानंतर राज्य सरकारच्या कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडाला आहे. बदनापूर बोर्डातून दहावाची प्रश्न पत्रिका बाहेर आलीच कशी? अशी चर्चा सुरू आहे. प्रवीण दरेकर यांनी याप्रकरणी कारवाई केली जाईल असे म्हटलेय.