देशातील ९.८ कोटी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. PM किसान सन्मान योजनेचा १९वा हप्ता कधी येणार याची तारीख अखेर जाहीर करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २४ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान किसान सन्मान निधी अंतर्गत शेतकऱ्यांना १९वा हप्ता जारी करतील. अंतर्गत, सुमारे २२,००० कोटी रुपये हस्तांतरित केले जातील. पीटीआयच्या बातमीनुसार, पीएम-किसान योजनेअंतर्गत, प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्याला दर चार महिन्यांनी २,००० रुपयांच्या ३ समान हप्त्यांमध्ये ६,००० रुपयांचा वार्षिक लाभ दिला जातो.
‘या’ तारखेला PM किसान सन्मान योजनेचा १९वा हप्ता येणार थेट शेतकऱ्यांच्या खात्यात
