अलीकडच्या काळात गुन्हेगारीच्या प्रकरणात भयंकर वाढ झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. विटा शहरात अलीकडेच ड्रग्ज प्रकरण उघडकीस आले. विटा एमडी ड्रग्ज कारखाना प्रकरणातील संबंधित कारखान्याच्या मालकीण गोकुळा विठ्ठल पाटील यांचा जामीन अर्ज विट्यातील जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळला आहे.
विट्याजवळील कार्वे औद्योगिक वसाहतीत प्लॉट नंबर ४३ वरच्या रामकृष्ण हरी माऊली इंडस्ट्रीज हा एम डी ड्रग तयार करायचा कारखाना होता. गेल्या महिन्यात २८ जानेवारी रोजी जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागा च्या पथकाने धडक कारवाई करून उध्वस्त केला. यांत ३० कोटींचे एम – डी ड्रग्ज सापडले आहे. या प्रकरणी संबंधित जो कारखाना ज्यांनी भाड्याने
दिला त्याच्या मालकीण विट्या तील – गोकुळा विठ्ठल पाटील या महिलेच्या वकिलाने आज शुक्रवारी विटा येथील जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये जमीनासाठी अर्ज केला होता.