विटा येथील कंत्राटदाराला महिलेबरोबर व्हॉट्स अपवर केलेले चॅटिंग प्रकरण मिटविण्यासाठी एक लाखांची खंडणी मागितल्याची माहिती संबंधित कंत्राटदाराने दिली. संशयित महिला रेश्मा राजू इमडे हिच्या विरोधात विटा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी कंत्राटदाराने एका महिलेच्या व्हॉट्स अपवर काही मेसेज केले होते. या मेसेजचा संदर्भ घेत २१ फेब्रुवारीस सायंकाळी रेश्मा हिने फिर्यादीला फोन केला.
तिने चॅटिंगसंबंधीचे प्रकरण मिटविण्यासाठी तसेच होणारी बदनामी थांबविण्यासाठी संशयित महिलेने कंत्राटदाराने कॉल कॉन्फरन्सवर १ लाख रुपयांची खंडणी मागितली. तसेच बोलणे पुढे चालू राहिल्यानंतर ती रक्कम कमी करून शेवटी ७० हजार रुपये तरी द्यावे लागतील, असे बोलून संशयिताकडे खंडणीची मागणी केली आहे. यावरून विटा पोलिस ठाण्यामध्ये रेश्मा इमडे महिलेविरोधात खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.