खानापुर तालुका विधी सेवा समिती व विटा वकील संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतिसिंह नाना पाटील शैक्षणिक संकुलामध्ये कायदेविषयक जनजागृती शिबिर संपन्न यावेळी अध्यक्षस्थानी दिवाणी न्यायाधीश आर. ए. शेख उपस्थित होते. यावेळी विटा वकील संघटनेचे अध्यक्ष अँड. सचिन जाधव, संस्थेचे अध्यक्ष सुभाष पवार, अँड. सुभाष पाटील, अँड. नानासाहेब पार्टील यांची प्रमुख उपस्थिती होती.
विटा वकील संघटनेचे अध्यक्ष अँड यांनी आपल्या प्रास्ताविकातून वाहतुकीचे नियम, बेटी पढाओ, बेटी बचाओ या विषयावर मार्गदर्शन केले. प्रमुख वक्ते अँड. सागर कदम यांनी आपल्या मनोगतातून बालहक्क विषयक कायद्यांची माहिती विद्यार्थ्यांना दिल्ली, कायदेविषयक जनजागृती शिबिरात बोलताना दिवाणी न्यायाधीश आर. ए. शेख. व अन्य.स्वप्नाली माने यांनी सक्तीचे व मोफत शिक्षण हक्क याविषयी माहिती दिली दिवाणी न्यायाधीश आर. ए. शेख यांनी विविध विषय हाताळताना संविधान शिक्षणाचे महत्त्व, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान, विद्याथ्यांचे क व कर्तव्य याविषयी मार्गदर्शन केले.