इस्लामपुरात अज्ञात वाहनाच्या धडकेत चिमुकली ठार

सध्या अनेक अपघातांच्या प्रमाणात वाढ झालेली आहे. या अपघातांमध्ये अनेक जणांचे प्राण देखील गमवावे लागले आहेत.इस्लामपूर  येथील शिवनगर परिसरातील इंदिरा कॉलनी रस्ता क्र. ६ येथे अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत रिधा गणेश सातपुते ही दिड  वर्षाची बालिका ठार झाली. ही घटना शुक्रवार दि. २१ रोजी ९.४५ च्या दरम्यान घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रिधा सातपुते ही घरातून बाहेर आली असताना अज्ञात वाहनाने तीला जोराची धडक दिली. या धडकेत तीचा मृत्यू झाला. याप्रकरणी अ ज्ञ T त चालकाविरूध्द इस्लामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात  आला आहे. याबाबत गणेश भरत सातपुते यांनी इस्लामपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत.