आटपाडी तालुक्यातील हिवतड येथील गेली सहा महिने नवीन वीज सबस्टेशन सुरू करण्याबाबत तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय सर्व अधिकारी यांना भेटून स्थानिक शेतकन्यांनी माहिती दिली होती. परंतु सबस्टेशन सुरू करण्याबाबत अद्याप कोणताही तोडगा प्रशासनाने काढला नसल्यामुळे हिवतड मधील शेतकरी सोमवार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण करणार असल्याची माहिती ऋषिकेश सांळुखे यांनी दिली. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाला याबाबत माहिती दिल्याचे नमुद करण्यात आले आहे.
हिवतड उपकेंद्रासाठी येणारी घाटनांद्र ते हितवड ३३ के. व्ही. लाईटचे काम हे घाटनांद्रे गावामध्ये काम बंद पडले आहे. ते चालू करणेबाबत पाठपुरावा करावा. मौजे ताडाची वाडी येथील वनविभाग हद्दीतील ५ पोलउभा करणेसाठी पनवानगी मिळाली. मौजे तळेवाडी येथील वनविभाग हदीतील ३ पोल उभ करणेसाठी परवानगी द्यात यावी. अशी मागणी करण्यात आली होती.