निवडणुकीच्या प्रचाराचा धुराळा उडला तरी आटपाडी तालुक्यामध्ये निवडणुकीचे वातावरण तापण्यास सुरुवात झालेली नाही. महायुतीच्या व महाविकास आघाडीच्या नेतेमंडळींनी युती व आघाडी धर्म पाळणार असल्याचे जाहीर केले. प्रत्यक्षात त्यांच्या समर्थक व कार्यकर्त्यांना मोकळे सोडले असल्याने मतदारांमध्ये मत स्पष्ट नाही.शिवसेना शिंदेसेनेचे नेते तानाजी पाटील व माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांचा जुना स्नेह आहे. त्यामुळे तानाजी पाटील यांनी अद्याप भूमिका स्पष्ट केली नसल्याने कार्यकर्ते संभ्रमात आहेत.
त्यांचे काही कार्यकर्ते बंडखोर उमेदवाराच्या प्रचारात फिरताना दिसत आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वी महायुतीचे संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे जनता कोणाच्या पारड्या मते टाकणार याविषयी उत्सुकता आहे.महायुतीतील भाजपचे उमेदवार संजय पाटील यांचे आटपाडी उमेदवार संजय पाटील व भाजपच्या देशमुख गटाची बैठक झाली. यामध्ये आमदार गोपीचंद पडळकर गटाचे कार्यकर्ते हजर नसल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. आटपाडी तालुक्यात कोणत्याच पक्षाची जाहीर सभा झाली नाही.
त्यामुळे सर्वपक्षीय नेते व्यासपीठावर असलेतरी त्यांची भूमिका गुलदस्त्यात आहे.तालुक्यामध्ये अनेक नेते आहेत. भाजपमध्ये माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख, विधान परिषदेचे आमदारगोपीचंद पडळकर व माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांचा मोठा गट आहे. त्याचबरोबर शिंदेसेनेचे आमदार अनिल बाबर समर्थक व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे महेशकुमार पाटील, आटपाडी संचालक तानाजी पाटील हेही युतीसोबत असल्याचे मानले जात आहे. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष वैभव पाटील यांचाही एक गट आटपाडीत आहे.