वस्त्रनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इचलकरंजीला स्वच्छ सुंदर इचलकरंजी असे देखील संबोधले जाते. परंतु अलीकडेच महापालिकेच्या या कारभारामुळे स्वच्छ इचलकरंजी म्हणणाऱ्यांसाठी एक नाराजीचा सूर उमटलेला आहे.
महापालिकेने चक्क मुतारी शेजारी करून शुद्ध केलेले पाणी पुन्हा शुद्धीकरण करून पिण्याची वेळ ही आता नागरिकांवर उद्भवलेली आहे. इचलकरंजीतील आयजीएम समोरील गोकुळ चौकात हा प्रकल्प उभारला असून यामुळे नागरिकांमध्ये खूपच संताप व्यक्त होत आहे.
पिण्याचे शुद्ध पाणी नागरिकांना मिळावे यासाठी आ. प्रकाश आवाडे यांनी विशेष प्रयत्न करून 94 शुद्धजल प्रकल्प मंजूर केलेले आणि यासाठी तात्काळ निधी देखील राज्य शासनाकडून देण्यात आले होते. ताराराणी पक्षाच्या वतीने मोर्चे काढून इशारा दिल्यानंतर या हालचाली गतीमान झाल्या आणि बहुतांशी प्रकल्प उभारणी देखील करण्यात आली.
मात्र यातील काही प्रकल्प चुकीच्या पद्धतीने आणि चुकीच्या जागेवर उभारलेले असल्यामुळे नागरिकांतून एकच नाराजीचा सूर उमटत आहे.